आनंद वेदना
सुख-सागर दृष्टीपथातच होता
तेव्हा आला दुःखाचा डोंगर आड
का सोन-किनार लाभावी म्हणून
मुद्दाम गेलाय...सुर्य ढगा आड़
आरशाला पडलेल्या बिलोरी स्वप्नाची आहे गम्मंत मोठी न्यारी
असंख्य तुकड्यान मधे ही जपतोय त्याचीच अवीट गोडी
लाटांना असत नाही तमा किनारीच्या निवाऱ्याची
कधी मृदू वाळु लाभे तर कधी संगत कपारिची
मर्म हे जाण तु, मना, समजून घे मुक्तीचा साक्षात्कार
घे झोके अलिप्त होऊन पाही भरती-ओहोटी एक समान
No comments:
Post a Comment