बाप्पा
चतुर्थीला लगबग झाली
स्वर्गलोकीची दारे हलली
उंदरावरती तोल सावरत
निघाली निघाली गणरायांची स्वारी निघाली ।।१।।
कुणी ढोलताशा गुलाल उधळी
कुणी पालखीत घेउनी मिरवी
बाप्पांच्या गजरात न्हाऊन
आली आली गणरायांची स्वारी आली ।।२।।
मखरी तुंदिल तनु शोभली
लाडू-मोदक ताटे सजली
शमी-दुर्वा-केवडा लेऊन
बैसली बैसली गणरायांची स्वारी बैसली ।।२।।
गजानना तव रूप मनोहर
साठविता त्या येई गहिवर
अतृप्त मने नयने भिजवून
निघाली निघाली गणरायांची स्वारी निघाली ।।३।।
चतुर्थीला लगबग झाली
स्वर्गलोकीची दारे हलली
उंदरावरती तोल सावरत
निघाली निघाली गणरायांची स्वारी निघाली ।।१।।
कुणी ढोलताशा गुलाल उधळी
कुणी पालखीत घेउनी मिरवी
बाप्पांच्या गजरात न्हाऊन
आली आली गणरायांची स्वारी आली ।।२।।
मखरी तुंदिल तनु शोभली
लाडू-मोदक ताटे सजली
शमी-दुर्वा-केवडा लेऊन
बैसली बैसली गणरायांची स्वारी बैसली ।।२।।
गजानना तव रूप मनोहर
साठविता त्या येई गहिवर
अतृप्त मने नयने भिजवून
निघाली निघाली गणरायांची स्वारी निघाली ।।३।।
No comments:
Post a Comment