संस्कृती
पूर्वी लोकसंख्या खूप कमी होती
शहरे जवळजवळ नव्हतीच पण… गावे मात्र होती
सण होते आपुले... निसर्गाच्या प्रत्येक श्वासाशी एकरूप
सुजाण जनता जाणत होती…म्हणुनतर संस्कृतीला आले सुरूप
नाही उरली गावे आज…आहे सूजट शहरी पसारा
नाही उरली समंजस जनता … हरवला लयबद्ध निसर्ग सारा
केली त्यानेच निर्मिती आपुली … आपण नाही त्याचे माय- बाप
तरी अट्टहास आपुला... देऊ त्यास सर्वार्थे ताप
संस्कृती चिरंतर ऒघ असे हा…नसे त्यास पुर्णबिंदू
जो वाहत राही त्या प्रवाहे…तगला तोची… अर्थ गहन जाण तू
प्रत्येक युगात होणार बंद… व्यर्थ ती पूजा 'इंद्र देवाची'
हे युग आहे केवळ 'गोवर्धन' नामस्मरणाचे ...
तेव्हा अवडंबर त्यजुनी, ऊठ मानवा…रोव बीज आता ध्यान- धारणेचे

No comments:
Post a Comment