कुसुम गान
उमलू द्याना... फुलू द्याना...झाडावरती झुलू द्याना |
वाऱ्यासवे डोलुनी जरासे...गंध वेंधळा उधळू द्याना || १ ||
दवबिंदूंचे थेंब चमचमते...अंगावरती लेवू द्याना |
सेवून सहस्त्रकिरण रेशमी ... सोन पाकळ्या पसरू द्याना || २ ||
कृष्णमेघे चिंब भिजूनी... कोवळी थरथर जाणवू द्याना |
पान पासोडी ओढूनी सत्वर ... एक डुलकी काढू द्याना || ३ ||
मधुशर्करा घेऊनी ओठी... गुंजारव मज ऐकू द्याना |
सुमधूर फळ ते पिकुनी नंतर.... ओंजळ रसवंती भरू द्याना || ४ ||
सुरक्षित रहता यावे मजला...घातलेस का तू काटेरी कुंपण?
अरे वेड्या! पुरले असते इवलाश्या त्या तळहातांचेही कोंदण || ५ ||
ऐकले नाहीस ना तू...घेतलेस ना मजला तोडून !!!
असे किती ते आयुष्य माझे?...पण तू घे तूझी फुलदाणी सजवून

....पण तू घे तूझी फुलदाणी सजवून || ६ ||
- कुसुमांजली
No comments:
Post a Comment