विरघळणे

 समुद्रकिनारी गेल्यावर कधीतरी आपण ओहोटीच्या वेळी वाळूची एक सुबक प्रतिमा तयार करतो. मग जशी भरती येते तसे आपण मागे सरतो आणि आपण तयार केलेली प्रतिमा समुद्राच्या पाण्यात विरघळताना बघतो. थोडेसे वाईट वाटते पण थोडेसेच. का? कारण आपल्याला पक्के ठाऊक असते भरती आल्यावर आपण बनवलेले टिकणार तर नाहीच आहे. उलट ओहोटी झाल्यावर त्याच जागी नव्या जोमाने परत तीच किंवा नवीन प्रतिमा तयार करण्यात रमतो. पण हेच *विरघळणे* आपण आपल्या आयुष्यात सहजपणे नाही स्वीकारत. नंतरच्या त्या सपाट झालेल्या वाळूत परत ते आणि तसेच शोधत राहतो, अगदी अस्तित्वात नसलेल्या खुणा सुद्धा. अशावेळी आरती प्रभूची कविता मनाला स्पर्शून जाते ... गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे...जे खरेतर फक्त स्वतःसाठी असते...गेले घ्यायचे राहून माझे नक्षत्रांचे देणे.

- कुसुमंजली

No comments: