वात्रटिका
|| लोकशाहीश्वर प्रसन्न || १८-जून-२०१२
राष्ट्रपती भुवना कडे पाऊले चालती संथ संथ
****
'ममते'ची 'मुलायम' धाक, करी कासावीस काँग्रेसीजना
परी राष्ट्रपती हे प्रणबची होऊ दे गजरती
'री' ओढा विनविती द्या रे 'त्या' अनुमोदना
****
कलाम कमाल करिती, म्हणती आता पुनश्च होणे नाही राष्ट्रपती ऐका
तोच सर्वपक्ष अंतर्गत काढिती ती 'उठा-बशा' घेउनी वरचेवरी 'बैठका'
'खेळ' ऐसा रंगलासे, दंगलासे असता राजधानीत
हाय रे! कधी होईल राष्ट्रपती भुवन पुनरपि 'सनाथ'
|| श्री लोकशाहीश्वर समर्पणमस्तु ||
No comments:
Post a Comment