एक झिम्मड पाउस
एक झिम्मड पाउस घनघोर बरसणारा
धरित्रीच्या शेल्यावर मारवा पाचु उधळणारा || १ ||
एक झिम्मड पाउस रानात गुंजणारा
धरित्रीच्या शेल्यावर मारवा पाचु उधळणारा || १ ||
एक झिम्मड पाउस रानात गुंजणारा
मोराच्या पाऊलात ताल होऊन थिरकणारा || २ ||
एक झिम्मड पाउस कड्यावर कोसळणारा
सागराच्या ओढीने दुथडी भरून धावणारा || ३ ||
एक झिम्मड पाउस पाने-वेलींचा आसरा घेणारा
हळव्या क्षणांचा सोबती अळवावर ठरू पाहणारा || ४ ||
एक झिम्मड पाउस समुद्रात मिसळणारा
डोळ्यातले खारे पाणी जणु गोड करु धडपडणारा || ५ ||
एक झिम्मड पाउस शिंपल्यात सामावणारा
मोतियाच्या रूपाने पुनर्जन्म घेऊन राहणारा || ६ ||
एक झिम्मड पाउस वाळवंटात भरकटणारा
वाळुच्या कणाकणात स्वतःचे अस्तित्व विसरणारा || ७ ||
असाच एक झिम्मड पाउस मनात माझ्या डोकावणारा
इंद्रधनु स्वप्नांचे कवडसे वेचणारा || ८ ||

No comments:
Post a Comment