करपलेल्या कळ्या
आर्त किंकाळीचा तेव्हा होतो मुका आभास
गर्भवास ठरतो जेव्हा लादलेला स्वर्गवास
नवरात्रीच्या गर्भि ओसंडे आदिमायेचा उल्हास
परी तिच्याच कैक लेकी न अवलोकिती पुर्णत्व नवमास
'त्याच्या' साठी रचले गेले कमळ पाकळ्यांचे थर
'तिच्या' येण्याचे गुंफले गेले मात्र काटेरी सर
पण'ती'च नाही उरली आता
अनुबंध तो संपला
वंश 'दिवा' लाउ पाहता
पण आधारच आता खुंटला
- कुसुमांजली
- कुसुमांजली
No comments:
Post a Comment