मनोवेध
संध्येच्या अंतरंगी...सप्तरंगात विलोपले
दुलई धुक्याची...नकळत बाहू पसरले
क्षण साठवणीतले...क्षणात सारे विखुरले
विस्मृतीतले देवकण पुसती…
फिर जाने कब हम मिले…फिर जाने कब हम मिले
**************
थिरकवा मोराचा असा काही खुले
पिसाऱ्याचा चांदवा आभाळी फुले
अनावर घननीळ प्रतिबिंबा भुले
अन आरसपानी थेंबावर मन माझे झुले
**************
बोचरी ठंडी कुणालाच आवडत नाही नुसतीच येते म्हणते आणि येऊन हाडात भिनते
पण शेकोटीची मजा ती काय
हे तिच्या विना का कळते
**************
मृतिकेचा कण अनेकदा कुंभारासी वदला
तुझ्या कृपेने आज मजला पुर्नजन्म आहे लाभला
धुळ खात पडलो होतो असा मी
तूच मज आकार दिला
**************
जगाची आहे कैसी बघा विपरित रीत
दगडाचा करुनी देव तया करी नमस्कार
आणि मनुष्यरूपी देवालागी लाथा बुक्यांचा भडिमार
**************
कापूस आणि ढगाची एकदा गुपचुप भेट घडे
त्यांच्यात घडलेले संभाषण चुकून माझ्या कानी पड़े
पृथ्वीवरती वस्त्र होऊनी मी सर्वांचे रक्षण करे
ढग्या, तू थोडा घनघोर बरसुनी त्या सर्वांना भिजवी बरे
**************
नुसताच फिरायचा कधी कधी
वारयाला येतो कंटाळा
गिरकी घेतली त्याने की मग
होतो भलताच घोटाळा
**************
जीवन म्हणजे जणू
अनंत क्षणांचा पसारा
भविष्याचे वर्तमान होई तोच
भुतकाळाचा घेई आसरा
**************
अहंकारा तुज सांगणे
कापुरा सारखे जळणे
केवळ एक आस धरणे
नाही मागुती उरणे
**************
धरावी आस तुझी
तुझी करावी रे पूजा
पुजनी अर्पावे तुज तन-मन
तन-मन रे देऊन घालवावे मी पण
**************
तुज आणि माझ असच काही आहे
नाही नाही म्हणताना थोड थोड आहे
आता बोलू मग बोलू अस बरच काही आहे
एवढ सगळ आहे तर मग वेडया वाट कुणाची पाहे
**************
सख्या तुझी आठवण
फुलवी प्रीतीचा मधुगंध
जैसी सर पावसाची पहिली
पसरी मृण्मयी सुगंध
**************
तुझ्या मनीचा चांदवा
करी प्रेमाची पखरण
माझा शेला धरित्रीचा
करी तयाची साठवण
**************
श्वास ओठांची ती मेळी
वेणुतुन मधुर सुर काढी
तैशी तुझीया नयनांची रे बोली
माझीया मनीची तार छेडी
**************
भ्रमर मन तुझे
रुंजे माझीया कमलदळी
पारिजात मन माझे
सडा तुझीया अंगणी
**************
कधी तरी मनात साठलेली प्रीत
नकळत माझ्या नज़रेतुन बरसते
मग तू त्यात भिजू नये म्हणुन
हलकेच पापण्या पांघरते
**************
मनाच्या बागेत एकदा
बकुळीच फूल आल
आणि त्याला जपायच्या नादात
स्वतःला मात्र विसरून गेल
**************
पावसाचा थेंब नाचरा
हळूच गाली स्थिरावला
आणि ओघळणारया अश्रुं मध्ये
स्वतःलाच हरवून बसला
**************
दूसरयाच्या मना मध्ये काय चाल आहे
ह्याचे मनाला सतत ध्यास असतो
पण घरात डोकवायची वेळ आली की
कवाडे घट्ट बंद करून घेतो
**************
सुर्याचे किरण सोनेरीच असतात
उषेला जवळ घेताना
आणि संध्येला कवेत घेताना मात्र
जरा लाजरे होतात
**************
तू समोर नसलीस की
मनाचा लिफाफा होतो
तू जवळ असलीस की
त्याचा टीपकागद होतो
**************
विमानातून प्रवास करताना जग किती इवलस दिसल
छोटी घरे, छोट्या गाड्या बघून खुपच आली मौज
तेव्हा सहज मनात विचार आला
उगीच नाही देवाला खेळ मांडायची हौस
**************
पात त्रुणांची एक, दवबिंदुला म्हणाली
निष्तेज ह्या तनुला तूच देई रे झळालि
वाट पाहते तुझी मी, अभिसारिका होउनी
**************
वारया वारया अरे तुझा चाले स्वछन्द प्रवास
श्वासा माजी चाले जेव्ह्ना परमेश्वराचा सहवास
तैसे मन माणसाचे घेई उंच रे भरारी
कोंडून ठेवी रे तयासी भेटे सवळा मुरारी
**************
हातात हाथ उमजुन दिला तर ती जुळलेली प्रीत
हातात हाथ नकळत दिला ही तर कळलेली प्रीत
**************
होई ओळख पहिली
बोलांनी वाढवावी
जुनी होत जे तैशी
मनाने पारखावी
**************
दुसरयाच्या जखमेवर मीठ
आपण का बरे चोळतो?
तीच वेळ स्वतःवर आली की
हळूच फुंकर घालतो
**************
मी तुझ्याकड़े औषध मागायला आलो आहे
कारण खुप दिवसांपासून माझी झोप उडाली आहे
पण खरतर मला औषध नकोच आहे
खर कारण तुला सुद्धा संसर्ग व्हावा हेच आहे
**************
पृथ्वी बाई तू गा मोठी
जपे उदरी संसार
नाजुक केळ सोसे जैशी
केळफुलाचा संभार
**************
तुला मी तसा रोजच भेटत आलो आहे
पण मुद्दाम सांगायच म्हणजे
आज माझ्या हृदयाच्या स्पंदनाला
तुझ्या प्रीतीची जोड़ आहे
**************
तुज कसे ते कळावे
माझ्या मनीचे गुपित
तुज कैसे ते समजवावे
सख्या अबोल माझी प्रीत
**************
डोंगरा तुला उंचीची
असावी किती रे मुजोरी
ढग येई बघ सावळा
घेरी तुला माथ्यावरी
**************
डोळे मिटून घेतले
त्याला झोप म्हणत नाही
डोळे सताड उघडे असले
तरी दिसेलच असे नाही
**************
तुझ्या मनीच्या कोंदणी
माझ्या प्रीतिचा रे हीरा
जसा शिंपला समुद्री
देई मोतिया आसरा
**************
प्रेमाची ऊब मिळते
सहवासाच्या संगतीत
त्याच प्रेमाचे निखारे मात्र फुलतात
विरहाच्या भट्टित
**************
मुग्ध तिच्या डोळ्यातील भाव
अचूक त्याने वाचले
प्रतिबिंब तयाचे होउनी
त्याच्या डोळा साचले
**************
आधी होई पुर्ण शब्दांची गुंफ़ण
चढविला त्यास संगीताचा बाज
गोड गळ्यातुन उतरता
चढ़े परिपूर्ण साज
**************
चांदण्यात फिरताना
तुला तुझ्याच नकळत टिपायचे
भाव-विभोर तव डोळ्यांमधले
कवडसे मनसोक्त वेचायचे
**************
अश्रुंना म्हणावे तरी काय
रडताना बरसतातच पण हसताना सुद्धा टपकतात
नाण्याच्या दोन्ही बाजू त्यांना
सारख्याच का वाटतात?
**************
अघळ पघळ तेलात
कडबोळी मोकाट सुटली
काय सांगु आता….
'चकली' रे चकली
दुलई धुक्याची...नकळत बाहू पसरले
क्षण साठवणीतले...क्षणात सारे विखुरले
विस्मृतीतले देवकण पुसती…
फिर जाने कब हम मिले…फिर जाने कब हम मिले
**************
थिरकवा मोराचा असा काही खुले
पिसाऱ्याचा चांदवा आभाळी फुले
अनावर घननीळ प्रतिबिंबा भुले
अन आरसपानी थेंबावर मन माझे झुले
**************
बोचरी ठंडी कुणालाच आवडत नाही नुसतीच येते म्हणते आणि येऊन हाडात भिनते
पण शेकोटीची मजा ती काय
हे तिच्या विना का कळते
**************
मृतिकेचा कण अनेकदा कुंभारासी वदला
तुझ्या कृपेने आज मजला पुर्नजन्म आहे लाभला
धुळ खात पडलो होतो असा मी
तूच मज आकार दिला
**************
जगाची आहे कैसी बघा विपरित रीत
दगडाचा करुनी देव तया करी नमस्कार
आणि मनुष्यरूपी देवालागी लाथा बुक्यांचा भडिमार
**************
कापूस आणि ढगाची एकदा गुपचुप भेट घडे
त्यांच्यात घडलेले संभाषण चुकून माझ्या कानी पड़े
पृथ्वीवरती वस्त्र होऊनी मी सर्वांचे रक्षण करे
ढग्या, तू थोडा घनघोर बरसुनी त्या सर्वांना भिजवी बरे
**************
नुसताच फिरायचा कधी कधी
वारयाला येतो कंटाळा
गिरकी घेतली त्याने की मग
होतो भलताच घोटाळा
**************
जीवन म्हणजे जणू
अनंत क्षणांचा पसारा
भविष्याचे वर्तमान होई तोच
भुतकाळाचा घेई आसरा
**************
अहंकारा तुज सांगणे
कापुरा सारखे जळणे
केवळ एक आस धरणे
नाही मागुती उरणे
**************
धरावी आस तुझी
तुझी करावी रे पूजा
पुजनी अर्पावे तुज तन-मन
तन-मन रे देऊन घालवावे मी पण
**************
तुज आणि माझ असच काही आहे
नाही नाही म्हणताना थोड थोड आहे
आता बोलू मग बोलू अस बरच काही आहे
एवढ सगळ आहे तर मग वेडया वाट कुणाची पाहे
**************
सख्या तुझी आठवण
फुलवी प्रीतीचा मधुगंध
जैसी सर पावसाची पहिली
पसरी मृण्मयी सुगंध
**************
तुझ्या मनीचा चांदवा
करी प्रेमाची पखरण
माझा शेला धरित्रीचा
करी तयाची साठवण
**************
श्वास ओठांची ती मेळी
वेणुतुन मधुर सुर काढी
तैशी तुझीया नयनांची रे बोली
माझीया मनीची तार छेडी
**************
भ्रमर मन तुझे
रुंजे माझीया कमलदळी
पारिजात मन माझे
सडा तुझीया अंगणी
**************
कधी तरी मनात साठलेली प्रीत
नकळत माझ्या नज़रेतुन बरसते
मग तू त्यात भिजू नये म्हणुन
हलकेच पापण्या पांघरते
**************
मनाच्या बागेत एकदा
बकुळीच फूल आल
आणि त्याला जपायच्या नादात
स्वतःला मात्र विसरून गेल
**************
पावसाचा थेंब नाचरा
हळूच गाली स्थिरावला
आणि ओघळणारया अश्रुं मध्ये
स्वतःलाच हरवून बसला
**************
दूसरयाच्या मना मध्ये काय चाल आहे
ह्याचे मनाला सतत ध्यास असतो
पण घरात डोकवायची वेळ आली की
कवाडे घट्ट बंद करून घेतो
**************
सुर्याचे किरण सोनेरीच असतात
उषेला जवळ घेताना
आणि संध्येला कवेत घेताना मात्र
जरा लाजरे होतात
**************
तू समोर नसलीस की
मनाचा लिफाफा होतो
तू जवळ असलीस की
त्याचा टीपकागद होतो
**************
विमानातून प्रवास करताना जग किती इवलस दिसल
छोटी घरे, छोट्या गाड्या बघून खुपच आली मौज
तेव्हा सहज मनात विचार आला
उगीच नाही देवाला खेळ मांडायची हौस
**************
पात त्रुणांची एक, दवबिंदुला म्हणाली
निष्तेज ह्या तनुला तूच देई रे झळालि
वाट पाहते तुझी मी, अभिसारिका होउनी
**************
वारया वारया अरे तुझा चाले स्वछन्द प्रवास
श्वासा माजी चाले जेव्ह्ना परमेश्वराचा सहवास
तैसे मन माणसाचे घेई उंच रे भरारी
कोंडून ठेवी रे तयासी भेटे सवळा मुरारी
**************
हातात हाथ उमजुन दिला तर ती जुळलेली प्रीत
हातात हाथ नकळत दिला ही तर कळलेली प्रीत
**************
होई ओळख पहिली
बोलांनी वाढवावी
जुनी होत जे तैशी
मनाने पारखावी
**************
दुसरयाच्या जखमेवर मीठ
आपण का बरे चोळतो?
तीच वेळ स्वतःवर आली की
हळूच फुंकर घालतो
**************
मी तुझ्याकड़े औषध मागायला आलो आहे
कारण खुप दिवसांपासून माझी झोप उडाली आहे
पण खरतर मला औषध नकोच आहे
खर कारण तुला सुद्धा संसर्ग व्हावा हेच आहे
**************
पृथ्वी बाई तू गा मोठी
जपे उदरी संसार
नाजुक केळ सोसे जैशी
केळफुलाचा संभार
**************
तुला मी तसा रोजच भेटत आलो आहे
पण मुद्दाम सांगायच म्हणजे
आज माझ्या हृदयाच्या स्पंदनाला
तुझ्या प्रीतीची जोड़ आहे
**************
तुज कसे ते कळावे
माझ्या मनीचे गुपित
तुज कैसे ते समजवावे
सख्या अबोल माझी प्रीत
**************
डोंगरा तुला उंचीची
असावी किती रे मुजोरी
ढग येई बघ सावळा
घेरी तुला माथ्यावरी
**************
डोळे मिटून घेतले
त्याला झोप म्हणत नाही
डोळे सताड उघडे असले
तरी दिसेलच असे नाही
**************
तुझ्या मनीच्या कोंदणी
माझ्या प्रीतिचा रे हीरा
जसा शिंपला समुद्री
देई मोतिया आसरा
**************
प्रेमाची ऊब मिळते
सहवासाच्या संगतीत
त्याच प्रेमाचे निखारे मात्र फुलतात
विरहाच्या भट्टित
**************
मुग्ध तिच्या डोळ्यातील भाव
अचूक त्याने वाचले
प्रतिबिंब तयाचे होउनी
त्याच्या डोळा साचले
**************
आधी होई पुर्ण शब्दांची गुंफ़ण
चढविला त्यास संगीताचा बाज
गोड गळ्यातुन उतरता
चढ़े परिपूर्ण साज
**************
चांदण्यात फिरताना
तुला तुझ्याच नकळत टिपायचे
भाव-विभोर तव डोळ्यांमधले
कवडसे मनसोक्त वेचायचे
**************
अश्रुंना म्हणावे तरी काय
रडताना बरसतातच पण हसताना सुद्धा टपकतात
नाण्याच्या दोन्ही बाजू त्यांना
सारख्याच का वाटतात?
**************
अघळ पघळ तेलात
कडबोळी मोकाट सुटली
काय सांगु आता….
'चकली' रे चकली
No comments:
Post a Comment