Posts

विरघळणे

 समुद्रकिनारी गेल्यावर कधीतरी आपण ओहोटीच्या वेळी वाळूची एक सुबक प्रतिमा तयार करतो. मग जशी भरती येते तसे आपण मागे सरतो आणि आपण तयार केलेली प्रतिमा समुद्राच्या पाण्यात विरघळताना बघतो. थोडेसे वाईट वाटते पण थोडेसेच. का? कारण आपल्याला पक्के ठाऊक असते भरती आल्यावर आपण बनवलेले टिकणार तर नाहीच आहे. उलट ओहोटी झाल्यावर त्याच जागी नव्या जोमाने परत तीच किंवा नवीन प्रतिमा तयार करण्यात रमतो. पण हेच *विरघळणे* आपण आपल्या आयुष्यात सहजपणे नाही स्वीकारत. नंतरच्या त्या सपाट झालेल्या वाळूत परत ते आणि तसेच शोधत राहतो, अगदी अस्तित्वात नसलेल्या खुणा सुद्धा. अशावेळी आरती प्रभूची कविता मनाला स्पर्शून जाते ... गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे...जे खरेतर फक्त स्वतःसाठी असते...गेले घ्यायचे राहून माझे नक्षत्रांचे देणे. - कुसुमंजली

अध्यात्माची विहिर

सदगुरुंची आज्ञा व्हावी, अध्यात्माची विहिर खोदावी | बुद्धीच्या पाणोठ्या जमिनीवर, विवेकाची पहार रुतावी || चित्ताच्या गर्तेत उपसण्या, हरीनामाचे फावडे घ्यावे | खणता खणता, घाम गाळता, निजध्यानाचे घाव द्यावे || विचार-मातीची ढिखळे निघता | होई षड्रीपू-खडकांचा ही निपटा || उन-पाऊशी खेळ जीवनी | परी लक्ष्य कधी न देई त्यजुनी || काळ सरता, शेवटचा तो प्रहार पडता | मायेचे ते कवच भेदुनी, झरा अखंड चैतन्याचा || अलिप्ततेचे लिंपण देऊनी, सत्संगाचा काठ घालूनी | शांतीची मग मोट बांध तू || समाधानाची घेऊनी घागर, ओढुनी दोरी परमार्थी सत्वर | रितेपणाचा ओघ साध तू || जीवनाचे सार्थक करण्या, सदगुरुंना शरण जाऊनी | आंनदाचे लेणे शेंद तू, आंनदाचे जिणे शेंद तू || जय गुरुदेव सादर वंदन कुसुमांजली

"भरुन" राहिलेले दत्तगुरु

** "भरुन" राहिलेले दत्तगुरु ** गाभाऱ्यात समोर शांत प्रसन्न मुर्ती, वातावरणात दरवळणारा पुष्पगंध, धुपाच्या मंद सुगंध लहरी आणि जोडीला गुढ शांतता. सगळ कस आॕल-इन-वन पॕकेज. दर्शन घेणे हा नित्याचाच भाग होता पण आज अवधूत "परके" वाटत होते. तो "परकेपणा" नेमका टिपता येत नव्हता. बरेच दिवसांपासून जे अनेक विचार मनात घोंघावत आहेत त्याचा हा परिपाक होता का? पुर्वी दत्तस्थानांवर जाऊन येण्याची एक ओढ असायची, ती आताशा नव्हती. अरेरे !  नाही जायला मिळाल म्हणून होणारी जीवाची घालमेल आता शांत होती. वाचनात येणाऱ्या अनुभव, अनुभूती यांच काहीच अप्रूप उरल नव्हत. किंबहुना त्यांच वाचन बंद झाल होत. पुजा, ग्रंथवाचन, पारायणे हे ही आपोआप सुटलेल. याचा अर्थ महाराजांवर असलेल्या भक्तिचा अंत झाला की काय? असल्या नसत्या शंका. नाही म्हणायला नित्य सुर्योदय-सुर्यास्ताच्या वेळी करण्यात येणारे अग्निहोत्र,  माळेवरच नामस्मरण आणि ध्यान साधना असे एवढेच काय ते चालू. बरं, अनुभूती वगैरे अस काही म्हणाल तर तस काहीच गाठीशी नाही,  ते असावच असा काही आग्रही नाही आणि ती नाही म्हणून खंत ही नाही. अवधूत. महा...

कुसुम गान

उमलू द्याना... फुलू द्याना...झाडावरती झुलू द्याना | वाऱ्यासवे डोलुनी जरासे...गंध वेंधळा उधळू द्याना || १ || दवबिंदूंचे थेंब चमचमते...अंगावरती लेवू द्याना | सेवून सहस्त्रकिरण रेशमी  ... सोन पाकळ्या पसरू द्याना || २ || कृष्णमेघे चिंब भिजूनी... कोवळी थरथर जाणवू द्याना | पान पासोडी ओढूनी सत्वर ... एक डुलकी काढू द्याना || ३ || मधुशर्करा घेऊनी ओठी... गुंजारव मज ऐकू द्याना | सुमधूर फळ ते पिकुनी नंतर.... ओंजळ रसवंती भरू द्याना || ४ || सुरक्षित रहता यावे  मजला...घातलेस का तू काटेरी कुंपण? अरे वेड्या! पुरले असते इवलाश्या त्या तळहातांचेही कोंदण || ५ || ऐकले नाहीस ना तू...घेतलेस ना मजला तोडून !!! असे किती ते आयुष्य माझे?...पण तू घे तूझी फुलदाणी सजवून ....पण तू घे तूझी फुलदाणी सजवून || ६ || - कुसुमांजली

संस्कृती

पूर्वी लोकसंख्या खूप कमी होती शहरे जवळजवळ नव्हतीच पण… गावे मात्र होती सण होते आपुले... निसर्गाच्या प्रत्येक श्वासाशी एकरूप  सुजाण जनता जाणत होती…म्हणुनतर संस्कृतीला आले सुरूप नाही उरली गावे आज…आहे सूजट शहरी पसारा नाही उरली समंजस जनता … हरवला लयबद्ध निसर्ग सारा केली त्यानेच निर्मिती आपुली … आपण नाही त्याचे माय- बाप तरी अट्टहास आपुला... देऊ त्यास सर्वार्थे ताप संस्कृती चिरंतर ऒघ असे हा…नसे त्यास पुर्णबिंदू जो वाहत राही त्या प्रवाहे…तगला तोची… अर्थ गहन जाण तू प्रत्येक युगात होणार बंद… व्यर्थ ती पूजा 'इंद्र देवाची' हे युग आहे केवळ 'गोवर्धन' नामस्मरणाचे ... तेव्हा अवडंबर त्यजुनी, ऊठ मानवा…रोव बीज आता ध्यान- धारणेचे  
बाप्पा चतुर्थीला लगबग झाली स्वर्गलोकीची दारे हलली उंदरावरती तोल सावरत निघाली निघाली गणरायांची स्वारी निघाली ।।१।। कुणी ढोलताशा गुलाल उधळी कुणी पालखीत घेउनी मिरवी बाप्पांच्या गजरात न्हाऊन     आली आली गणरायांची स्वारी आली ।।२।। मखरी तुंदिल तनु शोभली लाडू-मोदक ताटे सजली शमी-दुर्वा-केवडा लेऊन बैसली बैसली गणरायांची स्वारी बैसली ।।२।। गजानना तव रूप मनोहर साठविता त्या येई गहिवर अतृप्त मने नयने भिजवून निघाली निघाली गणरायांची स्वारी निघाली ।।३।।

मातृभूमी

मातृभूमी ह्रिदयम । मातृभूमी प्रियतम । मातृभूमी वन्दनम । दैदीप्य तथा उज्वलम । सुंदर अति मंगलम । तव लौकिकम अलौकिकम । नमामी नमामी सर्वदम ।।