Posts

Showing posts from July, 2012

पाउस खेळ

डोंगरमाथ्यावर नवल घडे... 'घन'श्याम तयाने अडवियले  ए ढग्या...बरस  आज   तु...म्हणुनी त्यासी थोपविले ||१|| 'मेघ'वर्ण मग क्रोधीत होई...विद्युलतेचा  धाक दाखवी   झाडे वेली फुले गोजिरी...वाऱ्या सवे तो गरगर फिरवी ||२||  सरसर  भाले बरसू लागती... निष्पाप तृण ते झेलुनी घेती त्या भाल्यांचे  मोती  होऊनी ... कर्णफुले ती  डुलू लागती ||३|| चिंब  सुळके बोलू लागती...आज आम्हातून शिल्प जन्मती  जलधारेचे स्रोत रेशमी...जिकडे तिकडे धाऊ लागती ||४||  रानफुले ती गाऊ लागती...रान वाटा  ऐकुनी  भुलती  कर्दळीच्या बनात जाता...परी वाटेतच हरवून जाती ||५|| बघण्या ऐसा खेळ अनोखा...रवी न रहावुन डोकवी माथा  चाहूल लागताच तयाची... ढग   घेई  गुपचूप  पाय काढता ||६|| - कुसुमांजली

तगमग

जिथे कलत्या सूर्या बरोबर आकाशही  चालू   लागे  तिथे मध्यान्हीचे चटके सहन करावे...तरी कितीदा  हे     आणि आज कुठेतरी आभाळ बरसू  पाहे   भरभरून     परंतु डोळ्यातला झरा तर कधीच गेलाय आटुन तरी सुद्धा मी अनेकदा निपटून काढली...माझ्याच ह्रिदयातली सल परी व्रण बुजताच परत  उचंबळून   येते...त्याच आठवणींची कळ जळीत जीवाची तगमग मी आता कायमची शमवणार आहे  तुझ्या  कैफेत   झोकुन, हे जीवन साधका,  स्वतःला   सावरणार   आहे