Posts

Showing posts from April, 2006

मनोवेध

संध्येच्या अंतरंगी...सप्तरंगात विलोपले दुलई धुक्याची...नकळत बाहू पसरले क्षण साठवणीतले...क्षणात सारे विखुरले विस्मृतीतले देवकण पुसती… फिर जाने कब हम मिले…फिर जाने कब हम मिले ************** थिरकवा मोराचा असा काही खुले पिसाऱ्याचा चांदवा आभाळी फुले अनावर घननीळ प्रतिबिंबा भुले अन आरसपानी थेंबावर मन माझे झुले ************** बोचरी ठंडी कुणालाच आवडत नाही नुसतीच येते म्हणते आणि येऊन हाडात भिनते पण शेकोटीची मजा ती काय हे तिच्या विना का कळते ************** मृतिकेचा कण अनेकदा कुंभारासी वदला तुझ्या कृपेने आज मजला पुर्नजन्म आहे लाभला धुळ खात पडलो होतो असा मी तूच मज आकार दिला ************** जगाची आहे कैसी बघा विपरित रीत दगडाचा करुनी देव तया करी नमस्कार आणि मनुष्यरूपी देवाला गी लाथा बुक्यांचा भडिमार ************** कापूस आणि ढगाची एकदा गुपचुप भेट घडे त्यांच्यात घडलेले संभाषण चुकून माझ्या कानी पड़े पृथ्वीवरती वस्त्र होऊनी मी सर्वांचे रक्षण करे ढग्या, तू थोडा घनघोर बरसुनी त्या सर्वांना भिजवी बरे ************** नुसताच फिरायचा कधी कधी वारयाला येतो कंटाळा गिरकी घेतली त्याने...