Posts

आनंद वेदना

सुख-सागर दृष्टीपथातच होता  तेव्हा आला दुःखाचा डोंगर आड  का  सोन-किनार लाभावी म्हणून  मुद्दाम   गेलाय... सुर्य  ढगा आड़ आरशाला पडलेल्या बिलोरी स्वप्नाची आहे गम्मंत मोठी न्यारी  असंख्य तुकड्यान  मधे ही जपतोय त्याचीच अवीट  गोडी  लाटांना असत नाही  तमा   किनारीच्या निवाऱ्याची कधी मृदू वाळु लाभे तर कधी  संगत कपारिची मर्म हे जाण तु, मना, समजून घे मुक्तीचा साक्षात्कार घे  झोके   अलिप्त होऊन  पाही  भरती-ओहोटी एक समान    

....विठ्ठल पंढरीचा

रामपारी उठतो | घुंघर काठी धरतो || घोंगडे पांघरोनी |  वनी   गोधने राखितो || तो हा बाल गोपाळ | नंदा घरचा || १ ||   वाटे अडवितो | दहि मटके फोडीतो || गोपी वस्त्रे पळवोनी | वेणु नादे भूलवितो || तो हा मनोहर | रमण राधेचा || २ || गुलाल खेळतो | प्रेमरंगे भिजवतो || शरदे वृन्दावनी | रासक्रीडेत रमतो || तो हा मुरलीधर | प्राणनाथ गोपिकांचा || ३ || डोही उतरतो | कालिया नमवतो || मथुरेस जावोनी | कंसास वधतो || तो हा जगजेठी | कान्हा देवकीचा || ४ || पोहे सुदाम्याचे  घेतो  | आवडी चाखीतो || उद्धव गोकुळ धाडोनी | प्रेमयोगे  ज्ञान   देतो || तो हा पुरषोत्तम | वर रुक्मिणीचा || ५ || वसने पुरवितो | दिन द्रौपदी रक्षितो || गीता उपदेशोनी | कर्तव्ये जाण देतो || तो हा जगदीश | सखा पांडवांचा || ६ || वाळवंटी नाचतो | भक्तिरसात डुंबतो || चाकर होवोनी | संत अंगणी राबतो || ऐसा चक्रपाणी |  माझा  राणा वैकुंठीचा || ७ ||

करपलेल्या कळ्या

आर्त किंकाळीचा तेव्हा होतो मुका आभास गर्भवास  ठरतो जेव्हा लादलेला स्वर्गवास नवरात्रीच्या गर्भि ओसंडे आदिमायेचा उल्हास  परी तिच्याच कैक लेकी न अवलोकिती पुर्णत्व नवमास  'त्याच्या' साठी रचले गेले कमळ पाकळ्यांचे थर 'तिच्या' येण्याचे गुंफले गेले मात्र काटेरी सर पण'ती'च नाही उरली आता अनुबंध तो संपला  वंश 'दिवा' लाउ पाहता  पण आधारच आता खुंटला - कुसुमांजली

एक झिम्मड पाउस

एक झिम्मड पाउस घनघोर बरसणारा धरित्रीच्या शेल्यावर मारवा पाचु उधळणारा || १ || एक झिम्मड पाउस रानात गुंजणारा  मोराच्या पाऊलात ताल होऊन थिरकणारा || २ || एक झिम्मड पाउस कड्यावर कोसळणारा सागराच्या ओढीने दुथडी भरून धावणारा || ३ || एक झिम्मड पाउस पाने-वेलींचा आसरा घेणारा हळव्या क्षणांचा सोबती अळवावर ठरू पाहणारा || ४ || एक झिम्मड पाउस समुद्रात मिसळणारा डोळ्यातले खारे पाणी जणु गोड करु धडपडणारा || ५ || एक झिम्मड पाउस शिंपल्यात सामावणारा मोतियाच्या रूपाने पुनर्जन्म घेऊन राहणारा || ६ || एक झिम्मड पाउस वाळवंटात भरकटणारा वाळुच्या कणाकणात स्वतःचे अस्तित्व विसरणारा || ७ || असाच एक झिम्मड पाउस मनात माझ्या डोकावणारा इंद्रधनु स्वप्नांचे कवडसे वेचणारा || ८ ||

वात्रटिका

|| लोकशाहीश्वर प्रसन्न ||   १८-जून- २०१२ एकमेका 'अ'साह्य करू अवघे धरू 'धुडघूस'पंथ राष्ट्रपती भुवना कडे  पाऊले चालती संथ संथ  **** 'ममते'ची 'मुलायम' धाक,  करी कासावीस काँग्रेसीजना  परी राष्ट्रपती हे प्रणबची  होऊ दे गजरती 'री' ओढा विनविती द्या रे 'त्या' अनुमोदना **** कलाम कमाल करिती,  म्हणती आता पुनश्च होणे   नाही  राष्ट्रपती ऐका  तोच सर्वपक्ष अंतर्गत काढिती  ती  'उठा-बशा' घेउनी वरचेवरी 'बैठका'   'खेळ' ऐसा रंगलासे, दंगलासे असता राजधानीत   हाय रे!  कधी  होईल  राष्ट्रपती भुवन पुनरपि 'सनाथ' || श्री लोकशाहीश्वर समर्पणमस्तु  ||

सावली - जय जानकी दुर्गेश्वरी / Sawli - Jai Janaki Durgeshwari

Image
Click Sawli - Jai Janaki Durgeshwari to download. Originally in Marathi, the translations are in Hindi and English.

नर्मदे हर हर / Narmade Har Har

Image
अंतरंग: